Mumbai Boat Accident Update : मुंबईत झालेल्या दुर्दैवी बोट अपघाताप्रकरणी नौदलाच्या स्पीड बोट चालकावर कारवाई करण्यात येणार आहे. पोलिसांनी नौदलाच्या स्पीडबोट चालकावर गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळ बुधवारी नौदलाची स्पीडबोट नियंत्रणाबाहेर गेली आणि प्रवाशांनी भरलेल्या बोटीला धडकली. या दुर्घटनेत तेरा जणांचा मृत्यू झाला होता. तर १०० हून अधिक नागरिकांना वाचवण्यात यश आलं. प्रवाशांनी भरलेली ही बोट एलिफंटा बेटावरून गेट वे ऑफ इंडियाकडे जात होती.
